अळीमिळी गुपचिळी
भारतात लोक कामव्यवहाराबद्दल बोलतच नाहीत. पाश्चात्त्य दृष्टिकोनात भारतीय उपखंड हे चित्रविचित्र इंद्रियानुभव घेणाऱ्यांचे आगर भासू शकते. त्या भागाच्या इतिहासात कामसूत्रही आहे, आणि आजचे पॉप स्टार्स ज्याचा उदोउदो करतात ते तांत्रिक व्यवहारही आहेत. भारतीयांना मात्र भारत हा पाश्चात्त्यांच्या लघळपणाविरुद्धच्या आणि चावट साहित्याविरुद्धच्या लढाईतील किल्ल्यासारखा वाटतो. हे बदलते आहे. चित्रपटातली चुंबने आणि कॉस्मॉपॉलिटन सारखी सचित्र मासिके आता …